ऑनलाइन खरेदी हा सहजसोपा पर्याय असल्याने त्याला मिळणारी पसंती दिवसेंदिवस वाढतेच आहे. पण त्यात काही धोकेही असतात. अनेकांची फसवणूक होते , वस्तू चुकीची मिळते , बिल भरूनही वस्तू हाताशी येत नाही वगैरे अनुभव अनेकांना येतात. ऑनलाइन खरेदी करताना घ्यावयाची खबरदारी अनेक ठिकाणी दिलेलीही असते. त्याकडेही दुर्लक्ष करणाऱ्यांच्यासाठी ऑनलाइन खरेदी करताना घ्यावयाच्या या काही टिप्स...
...
वेबसाइटना विक्री करताना डिस्ट्रिब्युटर , रिटेलरचे कमिशन द्यावे लागत नाही , त्यामुळे वस्तू स्वस्तात मिळतात. पण ऑनलाइन खरेदी करताना केवळ वस्तू स्वस्तात मिळते म्हणून खरेदी करू नका. ही खरेदी करताना वस्तूचा विक्रेता , विक्रीसाठीच्या अटी-नियम काळजीपूर्वक वाचा. काही ठिकाणी विक्रेत्या वेबसाइटची वॉरंटी मिळते तर काही ठिकाणी उत्पादकाची. उत्पादकाच्या सर्विस सेंटरचे जाळे मोठे असल्याने नक्कीच ती वॉरंटी अधिक फायदेशीर असते. बिलाच्या रकमेमध्ये व्हॅटचे पैसे समाविष्ट केले आहेत किंवा नाहीत याचीही माहिती करून घ्या. व्हॅटसह बिल नसेल तर सर्विस सेंटरवर प्रॉब्लेम येऊ शकतो. शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरी याच पर्यायाची निवड करा. जेणेकरून नंतर विचार बदलल्यास वस्तू परत करता येते किंवा हवी असल्यास वस्तू ताब्यात घेतल्यावर पैसे देता येतात.
* रिव्ह्यु वाचा
कुठलीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी इतरांच्या त्याविषयीच्या प्रतिक्रिया काळजीपूर्वक वाचा. गुगलवर त्या वस्तूविषयी सर्च दिल्यावर शक्यतो सुरुवातीच्या ५ प्रतिक्रिया सोडून इतर वाचा , जेणेकरून संतुलित माहिती मिळेल. सोबतच विक्री करणारी वेबसाइट सुरक्षित आहे ना , त्या वेबसाइटविषयी इतरांच्या प्रतिक्रिया कशा आहेत हे नीट पहा. वस्तूंच्या किमतीची विविध वेबसाइट तुलना करून पहा. त्यासाठी mysmartprice.com या वेबसाइटची मदत घेऊ शकता. ऑनलाइन खरेदी करताना खूप ऑफर्सही मिळतात. त्यांची माहितीindiafreestuff.com या वेबसाइटवरून घेऊ शकता.
* लिंक तपासून पहा
खरेदी करताना किंवा बिल भरताना वेबसाइटच्या अॅड्रेस पूर्वी https किंवा लॉकचे चिन्ह आहे ना याची खात्री करा. अशा लिंक वरून केलेले व्यवहार अधिक सुरक्षित असतात. तसेच लिंकचा पत्ता काळजीपूर्वक वाचा. काही फसवे लोक लिंकचा अड्रेसमध्ये सुरुवातीचे शब्द मूळ वेबसाइट प्रमाणे ठेवतात मात्र नंतरच्या शब्दांमध्ये बदल करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. तसेच मोबाइलमध्ये क्रेडीट कार्डची माहिती सेव्ह करून ठेवू नका.

This is such a nice and very Informative Blog
ReplyDeleteUPSC Coaching in Indore
MPPSC Coaching in Indore
MPSI Coaching in Indore
SSC Coaching in Indore
BANK Coaching in Indore
Civil Services Coaching in Indore