मराठी ई-पुस्तके आता वाचा संगणकावर!
आजकालचं मराठी साहित्य हे केवळ वह्यापुस्तकांमध्येच अडकून न पडता संगणक, मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपर्यात जाऊन पोचलंय. साहित्य चिंतन गेल्या ३ वर्ष्या पासून भारतीय साहित्याचे संगणकीकरन करतेय. कादंबरी, कथा, कविता, लेख, साप्ताहिक, मासिक इत्यादी साहित्य मोबाईलवर वाचता यावे म्हणून साहित्य चिंतनने मराठी बुक रीडर तसेच मराठी मोबाईल ई-बुक अप्लिकेशन अन्द्रोइडसाठी उपलब्ध केलेय.
आज “श्यामची आई” हे मराठी अन्द्रोइड ई-बुक अप्लिकेशन ५०००० हजार मोबाईलवर तर चाणक्य नीती आणि श्रीमद भगवत गीता हे हिंदी अन्द्रोइड ई-बुक अप्लिकेशन अनुक्रमे ७५००० व ५५००० हजार मोबाईलवरती डाउनलोड केल्या गेले आहेत. साहित्य चिंतनने भारतीय साहित्याच्या संगणकीकरन करण्याच्या उपक्रमाच्या माधमातून आता मराठी ई-पुस्तके उपलब्ध केलीय तुमच्या संगणकावर आणि याची सुरुवात होत आहे साने गुरुजींच्या “श्यामची आई” पुस्तका द्वारे.
संस्कार म्हणजे नक्की काय? बहुतेकांच्या मते घरी संध्याकाळी शुभंकरोती म्हणणे, मोठयांचा आदर करणे, खरे बोलणे, स्वच्छतेचे पालन करणे… पण हे संस्कार मुलांमध्ये रूजणार कसे? संस्कार हे एका पिढीतून दुस-या पिढीत रूजवायचे असतात. संस्कारांचा अनमोल ठेवा साने गुरूजी यांनी ‘श्यामची आई’च्या रूपाने लिहून ठेवला आहे. ‘श्यामची आई’ पुस्तकावर कितीतरी पिढया संस्कारक्षम झाल्या; साने गुरुजीनी लिहिलेले ‘श्यामची आई’ हे पुस्तक कोणत्याही काळात उपयुक्त ठरणारे पुस्तक आहे. कित्येक पिढ्यांवर सुसंस्कार करण्याचं काम या एका पुस्तकाने केलं. नाशिकला जेलमधे असतांना साने गुरूजींनी आईच्या आठवणी ५ दिवसात लिहून काढल्या. साने गुरूजींचे ‘श्यामची आई’ हे काही आत्मचरित्र, कांदबरी किंवा निबंध नाही. मातेबद्दलच असणार प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना ‘श्यामची आई’ या पुस्तकात आहे. हे सुंदर पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक म्हणजे सच्च्या दिलाने लिहीलेल्या आईच्या आठवणीं आणि अंतकरणापासून आईला वाहिलेली श्रघ्दाजंली, हृदयातील सारा जिव्हाळा यात गुरूजींनी ओतलेला आहे. म्हणूच मराठी ई-पुस्तके संगणकावर उपलब्ध करण्याचा श्रीगणेशा आम्ही करतोय ‘श्यामची आई’ ने.
साहित्य चिंतनच्या फेसबुक पानावर [https://www.facebook.com/SahityaChintan/app_220150904689418] एक “आवड (लाईक)” देऊन तुम्ही ‘श्यामची आई’ हे मराठी ई-पुस्तक तुम्ही संगणकावर डाउनलोड करून घेऊ शकता.
No comments:
Post a Comment