3 December 2013

स्वस्त आणि चांगला अँटिव्हायरस, सिक्युरिटी सॉफ्टवेअर

मागच्या वर्षी मी जेंव्हा माझा नवीन लॅपटॉप घेतला, तेंव्हाच मी माझ्या लॅपटॉपसाठी एखाद्या चांगल्या अँटिव्हायरसचा शोध घेण्यास सुरुवात केली. माझ्या लॅपटॉपचे पूर्णपणे संरक्षण करेल असा मला एखादा स्वस्त आणि चांगला अँटिव्हायरस हवा होता. त्यासाठी मी इंटरनेटवर बाजारात उपलब्ध असलेल्या अँटिव्हायरस उत्पादनांचे परिक्षण वाचले. त्यापैकी काही चांगले अँटिव्हायरस निवडून त्यापैकी सर्वाधिक किफायतशीर अँटिव्हायरस कोणता आहे? याची मी चाचपणी केली. विशेष गोष्ट म्हणजे सर्वाधिक चांगला म्हणून उल्लेखला गेलेला अँटिव्हायरसच भारतात सर्वाधिक स्वस्त होता.

चांगला अँटिव्हायरस, सिक्युरिटी सॉफ्टवेअर

मी मागील एक वर्षापासून माझ्या लॅपटॉपवर वापरत असलेल्या या अँटिव्हायरसचं नाव आहे, "बिटडिफेंडर". या अँटिव्हायरसची ‘बिटडिफेंडर टोटल सिक्युरिटी’ ही आवृत्ती मी वापरतो. "Top Ten Antivirus" असा जर आपण गूगलमध्ये शोध घेतलात, तर आपणास सर्वाधिक ठिकाणी ‘बिटडिफेंडर’ अँटिव्हायरस हाच क्रमांक एक वर दिसून येईल. माझा स्वतःचा देखील ‘बिटडिफेंडर टोटल सिक्युरिटी’ सोबतचा आत्तापर्यंतचा अनुभव हा चांगलाच आहे. मी आता बिटडिफेंडरची ही आवृत्ती पुढील तीन वर्षांसाठी घेत आहे.

खालील तक्त्यात बिटडिफेंडरच्या तीन आवृत्यांतील फरक नमूद केला आहे. ‘बिटडिफेंडर टोटल सिक्युरिटी’ मध्ये काय काय आहे? हे देखील आपणास यातून समजून येईल. हा तक्ता मोठ्या आकारात पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा. 

बिटडिफेंडर
बिटडिफेंडर सिक्युरिटी सॉफ्टवेअर

एक स्वस्त सिक्युरिटी सॉफ्टवेअर

मागील वर्षी केवळ ९०० रुपयांत मला ‘बिटडिफेंडर टोटल सिक्युरिटी’च्या तीन लायसेन्स कॉपीज्‌ मिळाल्या होत्या. आपण नॉर्टन, क्विक हिल अशा इतर सिक्युरिटी सॉफ्टवेअर्सची जर बिटडिफेंडरशी तुलना केलीत, तर हा दर अत्यंत कमी असा आहे.

काही नामांकीत आणि चांगल्या ्सिक्युरिटी सॉफ्टवेअर्सच्या या वर्षीच्या दरांची आपण खाली तुलना करु. हे दर जुलै २०१३ च्या सुरुवातीचे आहेत. हे सर्व दर एक वर्ष आणि एका संगणकासाठीचे आहेत.

1 Year 1 PCBitDefenderKasperskyNortonQuick HealMcAfee
AntivirusRs.260Rs.230Rs.229Rs.499Rs.349
Internet SecurityRs.484Rs.435Rs.749Rs.849Rs.749
Total SecurityRs.649Rs.935Rs.1,149Rs.1,099Rs.849

आपण जर एकाहून अधिक संगणकासाठी एक वर्षाची प्रत घेतलीत, किंवा एका संगणकासाठी एकाहून अधिक वर्षांची प्रत घेतलीत, तर आपणास हे सर्व सिक्युरिटी सॉफ्टवेअर अधिक स्वस्त दरात मिळतील.

2 comments: