आपल्या खिशात स्मार्टफोन असतोच. त्याचा वापर आपण आपल्या योग्य त्या गोष्टींसाठी केला तर इतरांना ऐषोरामाची वाटणारी ही गोष्ट आपल्याला खूप उपयुक्त ठरू शकते आणि त्याचा वापर आपण आपल्या विकासासाठी करू शकतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उपयुक्त असे अनेक अॅप्स अँड्रॉइड स्टोअरवर उपलब्ध आहेत. ज्याचा वापर करून आपण आपल्या महाविद्यालयातील अभ्यासापासून ते व्यवस्थापनापर्यंत अनेक गोष्टी अधिक सोप्या करू शकतो.
* गुगल प्ले बुक्स
तुमच्या अभ्यासाची अनेक पुस्तके महाग असतात. ही सर्व पुस्तके सर्वानाच विकत घ्यायला जमतात असे नाही. अशा वेळी तुम्ही ग्रंथालयाची मदत घेता. हे ग्रंथालय आता तुमच्या मोबाइलमध्ये उपलब्ध असून तुम्हाला अपेक्षित सर्व पुस्तके गुगल प्ले बुक्स या अॅपवर उपलब्ध होऊ शकतात. या अॅपमध्ये पुस्तक भाडय़ावर मिळते. हे भाडे अगदी मोजके असून ते पुस्तक तुम्हाला १८० दिवसांसाठी वापरता येऊ शकते. ही पुस्तके डाऊनलोड करण्यासाठी तुमच्याकडे चांगली बॅटरी लाइफ असलेला फोन असणे आवश्यक आहे. तसेच ती सेव्ह करण्यासाठी जागा असणेही आवश्यक आहे. ही पुस्तके सेव्ह करण्यासाठी जागा तुलनेने जास्त लागते. ही पुस्तके वाचण्यासाठी मोबाइलमध्ये पीडीएफ रीडर असणेही आवश्यक आहे.
हे अॅप आपल्याला अँड्रॉइड, आयफोनवर उपलब्ध आहे.

* एव्हरनोट
तुम्ही अनेकदा वर्गात नोट्स लिहिण्यासाठी वहीचा वापर करता. पण तुम्हाला तुमचे एखादे प्राध्यापक वर्गाच्या बाहेर भेटले आणि तिथे त्यांनी काही महत्त्वपूर्ण माहिती सांगितली, तर ती माहिती तुम्ही पटकन तुमच्या मोबाइलमध्ये टाइप करून सेव्ह करून ठेवू शकता. यामध्ये तुम्हाला एव्हरनोट नावाचे अॅप्लिकेशन उपयुक्त ठरू शकते. यामध्ये तुम्ही वेगवेगळे विभाग करून तुमच्या नोट्स लिहून ठेवू शकतात. इतकेच नव्हे तर तुम्ही फोटो काढून तो सेव्हही करून ठेवू शकता. यासाठी हे अॅप एकदम चांगली सुविधा देते आणि ते वापरण्यासाठीही खूप सोपे आहे. आपण जर एखाद वेळी वर्गात बसलो नाही तर आपल्या वर्गमित्राच्या नोट्सचा फोटो आपण यामध्ये सेव्ह करू शकतो. हे अॅप आपण ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने वापरू शकतो.
हे अॅप आपल्याला अँड्रॉइड, विंडोजफोन आणि आयफोनवर उपलब्ध आहे.

* ड्रॅगन मायक्रोफोन
तुमच्या वर्गात प्राध्यापक शिकवत असतील त्या वेळी तुम्हाला लिहून घेणे शक्य नसेल तर तुम्ही या अॅपचा वापर अगदी बिनधास्त करू शकतात. कारण हे अॅप स्पिक टू टेक्स्ट या फॉरमॅटमधील असून यामध्ये बोललेली गोष्ट टाइप होत जाते. हे अॅप सुरू केल्यावर तुम्हाला वायरलेस हेडफोन आवाजाच्या दिशेला ठेवायचा आहे. मग तुमचे काम झालेच म्हणून समजा. यामध्ये तुमचे शिक्षक सांगत असलेली प्रत्येक गोष्ट टाइप होत जाते व ते सेव्ह झाल्यावर आपण नोट्स म्हणून टाइप झालेल्या गोष्टीचा वापर करू शकतो. हे अॅप फ्री असून त्याचा वापर फ्रान्समध्ये सर्वाधिक होत आहे.

* ऑडिओ नोट
तुम्हाला तुमच्या वर्गातील नोट्स किंवा समूह चर्चेतील गोष्टी नोट्सच्या स्वरूपात सेव्ह करून हव्या असतील तर तुम्ही ऑडिओ नोट नावाचे हे अॅप अगदी बिनदिक्कतपणे वापरू शकतात. यामध्ये इलबिल्ट व्हॉइस रेकॉर्डर देण्यात आला आहे. ज्याचा वापर करून आपण ऑडिओ सेव्ह करू शकतो. एकदा का रेकॉर्डिग सेव्ह झाले की त्यावर आपण टॅप करायचे. मग त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला टाइप झालेल्या दिसतील. याचा लेआऊटपण इतका सुंदर देण्यात आला आहे की ज्याचा लूक अगदी नोट्स सारखाच आहे. हे नोट्स आपल्याला ई-मेल करता येऊ शकतात. यासाठी आपण टेक्स्ट किंवा ऑडिओ हे दोन्ही फॉरमॅट वापरू शकतो.

* क्विकोऑफिस प्रो एचडी
महाविद्यालयांमध्ये सध्या प्रकल्पांना मोठी मागणी असते. आपल्याला प्रत्येक विषयासाठी किमान एक तरी प्रकल्प करून तो सादर करावा लागतो. हा प्रकल्प आपण अगदी आपल्या फावल्या वेळात मोबाइलवरही बनवू शकतो. यासाठी आपल्याला क्विकोऑफिस प्रो एचडी हे अॅप उपयुक्त ठरू शकते. यामध्ये आपल्याला वर्ल्ड, एक्सेल आणि पॉवर पॉइंट मिळते, ज्याचा वापर आपण आपले विविध डॉक्युमेंट्स सेव्ह करून ठेवून शकतो. हे सेव्ह करण्यासाठी हे अॅप गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स, एव्हरनोट, शुगर सिंक अशा विविध क्लाऊड अशा विविध सोयी उपलब्ध आहेत. यामुळे आपण आपल्या फाइल्स इतर कुठेही ओपन करू शकतो. या अॅपच्या माध्यमातून आपण सेव्ह केलेल्या फाइल्स एडिट, सेव्ह आणि शेअर करू शकतो. लवकरच हे अॅप आपल्याला गुगल क्रोम या ब्राऊजवरही उपलब्ध होणार आहे.

* माय होमवर्क
माय होमवर्क हे अॅप आपल्याला आपल्या गृहपाठाची आठवण करून देत असते. या अॅपचा वापर करून आपण आपल्या वर्गाचे आणि अभ्यासाचे वेळापत्रक चांगल्या प्रकारे मांडू शकतो आणि ते ठरवू शकतो, ज्याचा फायदा आपल्याला गृहपाठ वेळेवर पूर्ण करण्यासाठी होऊ शकतो. यामध्ये आपण वर्षभर केलेल्या अभ्यासाची एकत्रित यादीही उपलब्ध होते. यामुळे आपल्याकडे संपूर्ण तपशील केव्हाही मिळू शकतो. याचा फायदा आपला परफॉर्मन्स तपासण्यासाठीही होतो.

* डिक्शनरी डॉट कॉम
आपल्याला अभ्यास करत असताना अनेक शब्दांचे अर्थ समजणे कठीण जाते. अशा वेळी आपण कपाटात कुठेतरी ठेवलेली डिक्शनरी शोधायला जाणार आणि नंतर आपण त्यातील शब्द शोधणार व अर्थ समजून घेणार. यापेक्षा आपण डिक्शनरी डॉट कॉम हे अॅप आपल्या मोबाइलमध्ये लोड केले की तेथे आपल्याला पाहिजे त्या शब्दांचे अर्थ मिळू शकतात. इतकेच नव्हे तर आपल्याला त्या शब्दाशी संबंधित म्हणी, वाक्प्रचार अशा अनेक गोष्टीही मिळतात. यामुळे त्या शब्दाचा पूर्ण अर्थ समजण्यास आपल्याला मदत होते.

No comments:
Post a Comment